वारिज ज्वेलर्स आणि ऑस्ट्रो जेम्स

दत्त गुरुजींबद्दल

दत्त अनंत सागवेकर · रत्न आणि ज्योतिष · २० वर्षांचा अनुभव

Pandit Datta Anant Sagveker at Vaarrija Jewellers and Astro Gems

दत्त अनंत सागवेकर, ज्यांना सगळे दत्त गुरुजी म्हणतात, गेली २० वर्षं रत्न आणि ज्योतिष या दोन्ही विषयांत काम करत आहेत. खार (पूर्व) मधल्या आमच्या दुकानातच ते बसतात, त्यामुळे तुम्हाला वेगळी अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही.

गुरुजी कसं काम करतात

गुरुजींची पद्धत साधी आहे. आधी ते तुमची अडचण शांतपणे ऐकतात. मग जन्मतारीख, वेळ आणि ठिकाणावरून कुंडली मांडतात. कुंडलीत नेमकं काय अडलं आहे ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगतात. आणि खरंच गरज असेल तरच रत्न सुचवतात.

प्रत्येकाला रत्न लागतंच असं नाही. काही वेळा गुरुजी फक्त उपाय किंवा मंत्र सांगतात. रत्न विकणं हा उद्देश नाही.

गुरुजी काय काय बघतात

पहिला सल्ला मोफत

पहिल्या भेटीत ज्योतिष सल्ल्यासाठी गुरुजी काहीही घेत नाहीत. तुम्ही दुकानात येऊ शकता किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर विचारू शकता. काय अडचण आहे ते आधी समजून घेऊ, मग पुढचं बघू.

व्हॉट्सअ‍ॅप करा कॉल करा