आमच्या दुकानाच्या पाटीवरच लिहिलं आहे, राशी रत्न बनवून मिळेल. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतं रत्न लागेल हे नीट ठरवणं. चुकीचं रत्न फायद्याऐवजी त्रास देऊ शकतं.
फक्त रास ऐकून रत्न सांगणं चुकीचं आहे. पूर्ण कुंडली बघितल्याशिवाय कोणतंही रत्न घालू नका, कुणाच्याही सांगण्यावरून नाही.
प्रत्येक रत्नाचा एक ग्रह असतो, आणि त्यानुसार धातू, बोट, वार आणि वजन ठरतं. गुरुजी हे सगळं लिहून देतात, आणि पहिल्यांदा घालण्याआधी काय करायचं तेही सांगतात.
गुरुजी सांगतील ते रत्न, सांगितलेल्या वजनात आणि धातूत, आमच्याकडे बनवून मिळेल. अंगठी असो वा लॉकेट.