सिंह राशीचे लोक आत्मविश्वासू आणि नेतृत्व करणारे मानले जातात. मान-सन्मानाला खूप महत्त्व देतात, आणि अपमान सहन होत नाही.
| राशी स्वामी | सूर्य |
|---|---|
| तत्त्व | अग्नी |
| राशी रत्न | माणिक |
| तारखा (सूर्य रास) | 23 जुलै - 22 ऑगस्ट |
महत्त्वाचं: वर दिलेल्या तारखा या सूर्य राशीच्या आहेत, ज्या इंग्रजी पद्धतीत वापरल्या जातात. भारतीय ज्योतिषात रास ही जन्माच्या वेळी चंद्र कुठे होता यावरून ठरते. बऱ्याच लोकांची चंद्र रास आणि सूर्य रास वेगळी असते. त्यामुळे तारखेवरून ठरवू नका, कुंडली बघून घ्या.
फक्त रास पुरेशी नाही. गुरुजी सूर्य ग्रह कुंडलीत कुठे बसला आहे, तो बलवान आहे की कमजोर, आणि सध्या कोणती महादशा चालू आहे हे बघतात. त्यानंतरच रत्न किंवा उपाय सांगितला जातो.